Sharad Pawar - Ajit Pawar : पुण्यातील साखर संकुलात कार्यक्रम, शरद पवार-अजित पवार शेजारीच बसले
Sharad Pawar - Ajit Pawar : पुण्यातील साखर संकुलात कार्यक्रम, शरद पवार-अजित पवार शेजारीच बसले
शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकत्र आलेत. पुण्यात साखर संकुल येथे कृषी क्षेत्रात AI च्या वापराबाबत बैठक आहे. बैठकीला दोन्ही पवार उपस्थित आहेत. तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ही आहेत.
हे ही वाचा...
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) बारामतीत एकाच मंचावरती आले असल्यानं राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राच्या कृषीक कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने दोघं एकाच मंचावर आले आहेत. या निमित्त बारामतीत निवडणुकांनंतर पहिल्यांदाच शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर आले आहेत. त्यामुळं सर्व राजकीय विश्वाचं लक्ष्य या कार्यक्रमाकडे लागलं आहे. पवार काका-पुतणे एकाच मंचावर आले, मात्र अजितदादा, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांकडे बघितले देखील नाही. शिवाय एकमेकांना नमस्कार करणं देखील टाळल्याचं दिसून आलं.























