School Murder Case : आठवीतल्या मुलाकडून दहावीतल्या मुलाची हत्या, शाळेतील मर्डरने सगळे अस्वस्थ
School Murder Case : आठवीतल्या मुलाकडून दहावीतल्या मुलाची हत्या, शाळेतील मर्डरने सगळे अस्वस्थ
अहिल्यानगरमध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनेच विद्यार्थ्यांचा खून केल्याने खळबळ उडाली होती... शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सीताराम सारडा विद्यालयात ही घटना घडली... आठवीतील विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून केला आहे... दोन्ही विद्यार्थी एकाच भागात राहणारे आहेत... क्रिकेट खेळाच्या करणावरून दोघांमध्ये भांडण झाल होत... शाळेत जेवणाच्या सुट्टी मध्ये दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झालं ,यात आठवीतील विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला केला... या हल्ल्यात दहावीतील विद्यार्थी गंभीर जखमी झाला त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे... दरम्यान या घटनेनंतर शाळा प्रशासनाने तातडीने बैठक घेत भविष्यात अशा कोणत्याही घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हंटले आहे...त्यासाठी शाळेत आलेल्या मुलांची दप्तर तपासणी, मधल्या सुट्टीत शाळेच्या बाहेर जाणाऱ्या विद्यार्थ्यांची नोंद वही ठेऊन त्यांची तपासणी करणे, शिस्त पालन समिती स्थापन करणे आणि विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारे समुदेशन करण्याबाबत उपाययोजना करणार असल्याचे म्हंटले आहे.





















