एक्स्प्लोर
Phaltan Doctor Case : 'रक्षकच जर भक्षक होत असतील तर सर्वसामान्यांनी काय करायचं?', कुटुंबाचा संतप्त सवाल
बीड (Beed) जिल्ह्यातील महिला डॉक्टर संपदा मुंडे (Dr. Sampada Munde) यांनी साताऱ्यातील फलटण (Phaltan) येथे आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बडदे (Gopal Badane) आणि प्रशांत बनकर (Prashant Bankar) यांच्यावर गंभीर आरोप आहेत. ‘माझ्या मरणास पोलीस निरीक्षक गोपाल बडदे जबाबदार आहे, ज्याने ४ वेळा माझ्यावर अत्याचार केले. तसेच, पोलीस प्रशांत बनकर यानेही मागच्या चार महिन्यांपासून माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला,’ असे डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्येपूर्वी हातावर लिहिलेल्या नोटमध्ये म्हटले आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही आरोपींना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी स्थानिक राजकारणी आणि पोलिसांकडून डॉ. मुंडे यांच्यावर दबाव आणला जात होता, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाची राज्य महिला आयोगानेही गंभीर दखल घेतली असून सखोल तपासाचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















