Sanjay Raut on Dasara Melava 2021 : सव्याज परतफेड करण्यासाठी उद्याचा दसरा मेळावा : संजय राऊत
मुंबई : दरवर्षी शिवतीर्थावर होणारा दसरा मेळावा कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाचा दसरा बंद हॅालमध्ये कमी लोकांच्या उपस्थित पार पडणार आहे. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याकडे देशाचं लक्ष लागलंय. यंदाच्या मेळाव्यात ठाकरेंची तोफ कुणाकुणावर डागणार? या विषयी बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, "आम्ही कोणालाही निशाण्यावर ठेवत नाही पण अंगावर आला तर सोडत नाही याला तुम्ही आखाडा बोला किंवा मंच बोला काहीही बोला. सव्याज फेड करण्यासाठी हा मेळावा आहे". एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत राऊत बोलत होते. या वेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर मत व्यक्त केले आहे. गेल्या वर्षभरापासून भाजप जे काही करतंय त्याचा समाचार उद्धव ठाकरे घेतील, असेही या वेळी राऊत म्हणाले.






















