Sanjay Raut Mumbai PC : मी ठाम, माझी मान जरी उडवली तरी मी झुकणारा माणूस नाही, राऊतांची पत्रकार परिषद
Sanjay Raut On Eknath Shinde मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी संवाद साधत एक खळबळजनक विधान केलं आहे. ईडीकडून अटक होण्याआधी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा मला फोन आला होता. मी वरती बोलू का?, गृहमंत्री अमित शाह यांना बोलू का?, असं एकनाथ शिंदे मला फोन करुन म्हणाले. यावर काहीच गरज नाही. तुम्ही माझ्याबद्दल वरती बोललात तरी मी तुमच्या पक्षात येणार नाही, असं संजय राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाले, असा गौप्यस्फोट स्वत: संजय राऊतांनी आज माध्यमांशी बोलताना केला. संजय राऊतांचं आज नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन आहे. या पुस्तकात देखील संजय राऊतांनी अनेक खळबळजनक दावे केले आहेत.
संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंमध्ये नेमकं काय बोलणं झालेलं?
ईडीकडून अटक होण्याआधी मला एकनाथ शिंदेंचाही फोन आला होता, असा दावा संजय राऊत यांनी केला. एकनाथ शिंदेंनी मला फोन करुन मी वरती बोलू का?, अमित शाह यांना सांगू का? असं विचारले. यावर नको, काही गरज नाही, असं मी म्हणालो, असं संजय राऊत म्हणाले. तसेच तुम्ही वरती बोलल्यानंतरही मी तुमच्या पक्षात येणार नाही, असं संजय राऊत एकनाथ शिंदेंना म्हणाले.























