Samruddhi Mahamarg EXCLUSIVE : समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा, MSRDCकडून तात्पुरती मलमपट्टी
समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा , एबीपी माझाच्या बातमीनंतर MSRDCकडून तात्पुरती मलमपट्टी, मात्र महामार्गाला पुन्हा भेगा पडल्याचं समोर, सरकारच्या नोटिशीला कंत्राटदाराकडून केराची टोपली
कोट्यामध्ये रुपये खर्च करून तयार केलेल्या समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा पडल्यास समोर आलाय. एबीपी माझा 11 जुलै रोजी समृद्धी महामार्गावर भेगा पडल्याचं समोर आणलं होतं. त्यानंतर राज्य विकास महामंडळ जागं झालं. त्यांनी भेगामध्ये सिमेंट भरलं मात्र अवघ्या महिन्याभरातच पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली. भेगांमधलं सिमेंट बाहेर पडू लागले त्याचे खपले हाताने निघत आहेत. त्यामुळे कोट्यावधी रुपये खर्च करून तयार केलेल्या समृद्धी महामार्गावर पुन्हा भेगा पडायला सुरुवात झाली आहे. रस्ते विकास महामंडळाने भेगा पडल्यानंतर सदरील कंपनीला नोटीस बजावली मात्र त्या नोटिशीला कंपनी दाद द्यायला तयार नाही. समृद्धी महामार्ग 443.7 किलोमीटरवर सध्या काय स्थिती आहे सांगतोय आमचा प्रतिनिधी कृष्णा केंडे...