Samruddhi Expressway च्या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण
Samruddhi Expressway च्या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण
आजपासून खुला झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले आहे. महामार्गाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याने आता नागपूर ते भरवीर (नाशिक) हे अंतर आता सहा तासात पूर्ण करता येणार आहे. शिर्डी येथे आज समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पार पडले. याआधी डिसेंबर 2022 मध्ये नागूपर ते शिर्डी अशा पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले. हा पहिला टप्पा 501 किमीचा आहे. आता, शिर्डी ते भरवीर हा 80 किमीचा टप्पा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आता शिर्डी ते भरवीर हे अंतर अवघ्या 40 ते 45 मिनिटात पार करता येणार आहे. शिर्डी ते भरवीर हा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर नागपूर ते भरवीर असा 600 किलोमीटरचा समृद्धी महामार्गावरील मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला आहे.



















