![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Sambhaji Nagar LIVE Accident : रील काढताना अपघात, Accelerator दाबला अन् कार थेट दरीत
श्नेता आणि तिचा मित्र शिवराज संजय मुळे (वय 25 रा.हनुमान नगर) हे छत्रपतीसंभाजीनगर येथून सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले. या ठिकाणी मोबाईलवर रिल्स बनवतांना तिने मित्राला सांगितले की, मीपण कार चालवून बघते. रिव्हर्स गिअर पडून,एक्सलेटरवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरुन खाली गेली यामध्ये या युवतीचा मृत्यू झाला. सुलीभंजन येथील दत्त मंदिराराचा परिसर विहंगम असून,पावसाळ्यात तो निसर्ग सौंदर्यांने अधिक खुलतो त्यामुळे भाविक ,पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. अशातच हे दोघेजण गुरुवारी (ता.17 जून) फिरायला आले. मोबाईलवर रिल्स बनवित असताना घात झाला. मंदिर परिसरातील या सौंदर्य निरीक्षण स्थळावर कठडे असते तर ही घटना घडली नसती अशी चर्चा होती.
सध्या सोशल मीडियावर रिल्स बनवून प्रसिद्ध होणाऱ्यांची संख्या फार आहे. काहीतरी स्टंट करायचा किंवा हुल्लडबाजी करुन प्रसिद्ध होण्याचं फॅड वाढत आहे. त्यामुळे अनेक रिल्स स्टार वेगवेगळे स्टंट करतात. अनेकदा जीवाला धोकादेखील निर्माण होऊ शकतो हे माहित असूनही अनेक लोक प्रसिद्धीसाठी असे घातक असणारे रिल्स करतात
![ABP Majha Headlines : 05 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/58b7e4b3503156b3973ac1b9715f566f1719404207329718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Pravin Darekar On Amol Mitkari : अमोल मिटकरी यांच्या तोंडाला लगाम घालण्याची गरज; दरेकर यांची टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/5fbb255cb64c78e835c8863187ba23b01719403817078718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Rahul Gandhi In Pandharpur Wari : 13 किंवा 14 जुलैला राहुल गांधी वारीत सहभागी होण्याची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/2601e531c693bfa22aa7edc1194c07bf1719402597841718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Anil Parab : मतदारांच्या यादीतून सोमय्यांचं नाव गायब, अनिल परब म्हणतात...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/58c54d5ae7cf0dec6aa5536f3e3157a21719401244827718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 04 PM : 26 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/319aea1cb85cf739695903b97fcc469f1719400878868718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)