(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sachin Vaze Case : सचिन वाझेंचे आरोप; भाजपचा हल्लाबोल
Sachin Vaze Case : सचिन वाझेंचे आरोप; भाजपचा हल्लाबोल माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर काही आरोप केले होते. या आरोपांचे त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होते. पण उत्तर देण्यासाठी फडणवीसांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करत आहे. राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी सरकारमधील काही लोक गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील लोकांचा वापर करत असल्याचे राऊत म्हणाले. फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या टोळीनं राजकारणाचा दर्जा खाली आणला तरुंगात सरकारचे प्रतिनिधी जात असल्याचे राऊत म्हणाले. जेलमध्ये असलेल्या आरोपीच्या एका वक्तव्याला एवढं महत्व का? असेही राऊत म्हणाले. या महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या टोळीनं किती खाली आणला आहे हे दिसत असल्याचे राऊत म्हणाले. याला फडणवीस पाठबळ देत असल्याचे राऊत म्हणाले.