एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Sachin Mali : 'नक्षलवाद देशासाठी घातक', Sachin Mali आणि Sheetal Sathe माझावर EXCLUSIVE
नागपूरमधील (Nagpur) ओबीसी मोर्चाच्या (OBC Morcha) पार्श्वभूमीवर, शाहिर सचिन माळी (Sachin Mali) आणि शीतल साठे (Sheetal Sathe) यांनी एबीपी माझाशी एक्सक्लुसिव्ह बातचीत करताना नक्षलवादावर (Naxalism) आपली स्पष्ट भूमिका मांडली. 'या देशाला संविधानाची गरज आहे आणि नक्षलवाद जो आहे, ज्याचा आरोप आमच्यावर झाला होता, तर नक्षलवाद या देशासाठी घातक आहे,' असे सचिन माळी आणि शीतल साठे यांनी म्हटले. आपल्यावर झालेल्या आरोपांमुळे आजही त्रास सहन करावा लागतो आणि ट्रोलिंगला सामोरे जावे लागते, असेही ते म्हणाले. आम्ही देशाला तोडण्याच्या नव्हे, तर जोडण्याच्या विचारधारेचे समर्थक असून, संविधानाचा मार्ग हाच देशासाठी योग्य मार्ग आहे, हेच आमच्या शाहिरीतून सांगत आलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















