एक्स्प्लोर
RSS Muslim Dialogue | दिल्लीत RSS-Muslim धर्मगुरूंची ऐतिहासिक बैठक, राष्ट्र प्रथम नारा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि देशातील महत्त्वाच्या मुस्लिम धर्मगुरूंची दिल्लीतील हरियाणा भवनात बैठक पार पडली. तब्बल साडेतीन तास चाललेल्या या बैठकीत देशभरातून साठ ते सत्तर मुस्लिम धर्मगुरू आणि विचारवंत सहभागी झाले होते. वक्फ बोर्ड, पहलगाम अतिरेकी हल्ला, लिंचिंग, मदरशांची स्थिती आणि बिहारमधील मतदार याद्यांपर्यंत अनेक विषयांवर चर्चा झाली. अखिल भारतीय इमाम संघटनेचे मुख्य इमाम डॉक्टर इमामउरअहमद इलियासी यांनी सांगितले की, "संवाद वह प्रक्रिया है जो हर समस्या का हल है। संवाद होते रहना चाहिए। संवाद से गलतफहमियां दूर होती हैं। संवाद करने से मिसअंडरस्टँडिंग खत्म होती है। संवाद करने से नफरतें खत्म होती हैं, मोहब्बतों में तब्दील हो जाती है। यह संवाद राष्ट्रहित में था।" शंभर वर्षानंतर अशी मोठी बैठक होत आहे, असे लखनऊच्या शाही इमामांनी नमूद केले. दोन्ही बाजूंनी कटुता कमी करणे आणि राष्ट्र सर्वोपरी ही भावना वाढीस लावणे हा बैठकीचा उद्देश होता. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सहसरकार्यवाह कृष्ण गोपाल, रामलाल आणि मुस्लिम राष्ट्र मंचचे इंद्रेश कुमार बैठकीला उपस्थित होते. संजय राऊतांनी या चर्चेचे स्वागत केले.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा























