Real Estate QR Code: घरांच्या जाहिरातींवर क्यूआर कोड बंधनकारक
Real Estate QR Code: 1 ऑगस्टपासून गृहनिर्माण प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रकारच्या जाहिरातींमध्ये क्यूआर कोड बंधनकारक करण्यात येणार आहे... मार्च अखेरपासून महारेराकडे नव्याने नोंदणी करणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी पत्रासोबतच प्रकल्पांचा समग्र तपशील असलेले क्यूआर कोडही द्यायला महारेराने सुरुवात केली आहे. क्यूआर कोड स्कॅन करताच एका क्लिकवर प्रकल्पाशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. सर्व प्रकारच्या जाहिरातींसोबत महारेरा क्रमांक आणि संकेतस्थळाच्याच बाजुला ठळकपणे हा क्यूआर कोड असणे अत्यावश्यक राहणार आहे. तसे परिपत्रक महारेराने नुकतेच जारी केले आहे.






















