अनधिकृतरित्या फोन टॅपिंग केल्याप्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता : सूत्र
मुंबई : राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी गृह विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यात बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर अनधिकृतरित्या फोन टॅपिंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.
फोन टॅपिंग झालं तेव्हा कुंटे हे गृहविभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव होते. आपल्याकडून या प्रकरणी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी घेतली नसल्याचं काल (बुधवारी) कुंटे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितले होते. तसंच काही प्रकरणात फोन टॅपिंगची परवानगी एका नंबरची घेतली आणि दुसरेच नंबर टॅप केल्याचंही कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. या प्रकरणात आता सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असल्याची माहिती आहे.
महत्त्वाच्या बातम्या



















