(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rajkot Killa Full Rada : राणे Vs ठाकरे समर्थक भिडले, राजकोट किल्ल्यावर काय घडलं?
Malvan Rajkot Fort Disput : सिंधुदुर्गातील मालवण राजकोट किल्यावर असलेला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यांत कोसळला. या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटल्याचं पाहायला मिळालं. या घटनेमुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. राज्यभरात या घटनेच्या पार्श्वभूमीवर आंदोलनं सुरू आहेत. अशातच आज महाविकास आघाडीकडूनही राजकोट किल्ल्यावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठरल्याप्रमाणे महाविकास आघाडीचे नेते त्याठिकाणी पोहोचले. पण, त्यासोबतच महायुतीचे नेतेदेखील तिथे दाखल झाले. खासदार नारायण राणेंसह माजी खासदार निलेश राणे देखील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी राजकोट किल्ल्यावर पोहोचले. कधीकाळी सहकारी असलेले आणि आता एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले ठाकरे आणि राणे आमने-सामने आले. त्यानंतर काही काळ राजकोट किल्ल्यावर तणावाचं वातावरण पाहायला मिळालं. दोन्ही पक्षांचे कार्यकर्तेय आपापसांत भिडले, त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना बाजूला केलं. त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते किल्ल्याची पाहाणी करण्यासाठी निघून गेले.
मालवण येथील राजकोट किल्ल्यावर भाजप खासदार नारायण राणे आणि निलेश राणे समर्थकांसह दाखल झाले होते. पाहणी करुन नारायण राणे आणि निलेश राणे समर्थकांसह परत निघालेले असताना मविआचे पदाधिकारी देखील तिथे दाखल झाले. आदित्य ठाकरे, विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यावेळी तिथं पोहोचले. शिवसैनिक आणि राणे समर्थक आमने सामने आले होते. याठिकाणी थोडी बाचाबाची झाली.