Raj Thackeray : शाळांमध्ये हिंदी कशी शिवकता हे बघतोच, राज ठाकरेंचं सरकारला चॅलेंज!
Raj Thackeray on Hindi Language Compulsory : तिसरी भाषा अनिर्वाय नाही मग पुस्तक छपाई का सुरु आहे? याला तुम्ही शाळांनी सहकार्य करु नका. सरकारच्या छुप्या मार्गानं भाषा शिकवण्याला बळी पडू नका, अन्यथा आम्ही हा महाराष्ट्र द्रोह समजू, असे पत्र राज्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांना पाठवणार असल्याची माहिती मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्यातील नव्या शिक्षण धोरणातील हिंदी भाषेच्या सक्तीला कडाडून विरोध केला. पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती नको, ही भूमिका राज ठाकरे यांनी याआधीही मांडली होती, आजही त्यांनी आपल्या जुन्या पत्रांची आठवण करुन देत, राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला.
पत्रकार परिषदेत राज ठाकरे म्हणाले की, "आज मी तिसरं पत्र सर्व शाळांच्या मुख्यध्यापकांना पाठवणार आहे. तिसरी भाषा अनिर्वाय नाही मग पुस्तक छपाई का सुरु आहे? याला तुम्ही शाळांनी सहकार्य करु नका. हिंदी भाषा सक्तीचा विषय येत नाही उत्तरेत काही राज्यात ही भाषा वापरली जाते. त्यांना त्यांची स्थानिक बोली भाषा संपवू द्यायची नाही. सध्या कागदी घोडे नाचवत आहे. जर भाषा सक्ती नाही तर मग पुस्तक छपाई कशासाठी करत आहात? उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे त्यासाठी भाषा सक्ती केली जात आहे. जी भाषा सक्तीची नाही जीचा काही उपयोग नाही अशी भाषा शिकवू नका."
महत्त्वाच्या बातम्या


















