Raj Thackeray Sanjay Raut : संजय राऊत यांची ईडी चौकशी होणार? राज ठाकरेंचं अप्रत्यक्ष वक्तव्य
Raj Thackeray vs Sanjay Raut : मनसेच्या 16 व्या वर्धापनदिनानिमित्त राज ठाकरे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला होता. आमचं राजकारण नकलावर चालत नाही, असे प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिलं होतं. आता राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या ईडी चौकशीवर अप्रत्यक्ष बोट ठेवलं आहे. संजय राऊतांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी, असं राज ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी संजय राऊत कुटुंबीयांच्या ईडी चौकशीवर अप्रत्यक्ष बोट ठेवलं आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी संजय राऊतांची नक्कल केली होती.त्यानंतर राऊत यांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं होतं. राज ठाकरेंच्या हस्ते शनिवारी ठाण्यातल्या दिव्यात मनसेच्या शाखेचं उद्घाटन पार पडलं..यावेळी शेकडो मनसैनिक उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊतांनी एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.