Priyanka Chaturvedi Mumbai : महाडिकांच्या वक्तव्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सवाल
Priyanka Chaturvedi Mumbai : महाडिकांच्या वक्तव्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सवाल
महिलांना उघडपणे धमकावणारे, भाजपचे खासदार! का या लाडक्या बहिणींचे पैसे भाजपच्या इलेक्टोरल बाँड्सचे वाटले जात आहेत? का या लाडक्या बहिणींचे पैसे शिंदे किंवा फडणवीसांच्या घरातून येतात? का या लाडक्या बहिणींचे पैसे पीएम केअर फंडाचेचे आहेत? का या लाडकी बहिणींचा पैसा मोदीजी आणि अमित शाह जी यांच्या खिशातून जातो? नाही! महाराष्ट्रातील जनतेने कष्टाने कमावलेला हा पैसा त्यांना दिला जात आहे. यावरून हे सिद्ध होते की, त्यांच्यासाठी ही योजना केवळ राजकीय फायद्यासाठी आहे, हा एक निवडणूक जुमला आहे.
हे ही वाचा..
भाजप खासदार आणि नांदेडचे नेते अशोक चव्हाण हेही जिल्ह्यातील राजकारणात निवडणुकांच्या अनुषंगाने सक्रीय झाले आहेत. भाजपा महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. दुसरीकडे लोकसभा पोटनिवडणुतही भाजप महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे लक्ष्य त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे, विधानसभा व लोकसभा निवडणुकीसाठी अशोक चव्हाण मोट बांधत आहेत. त्याच अनुषंगाने पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेबद्दल प्रतिक्रिया दिली. तसेच, शरद पवारांनी केलेल्या टीकेवरही पलटवार केला आहे. अशोक चव्हाण हे संधीसाधू असल्याची बोचरी टीका शरद पवारांनी केली होती. आता, शरद पवारांच्या टीकेला अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलंय. मी संधीसाधू तर शरद पवार कोण, याचंही उत्तर त्यांना द्यावं लागेल, असे चव्हाण यांनी म्हटलं.