पंतप्रधान Narendra Modi यांचा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम १ एपिलला होणार : ABP Majha
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम १ एपिलला होणार आहे. मात्र महाराष्ट्राचा विचार केल्यास मोदींच्या या कार्यक्रमाचं टायमिंग चुकलं का असा सवाल उपस्थित होतोय. कारण ज्या दिवशी मोदींचा हा कार्यक्रम आहे त्याच दिवशी राज्यात दहावीचा पेपर आहे. तसंच बारावीच्या परीक्षाही संपल्यात जमा आहे. त्यामुळे दहावी आणि बारावीच्या ३० लाख विद्यार्थ्यांना मोदींच्या या कार्यक्रमाचा तसा फायदा होणार नाही. शिवाय राज्यातील नववी आणि अकरावीच्या परीक्षासुद्धा जवळपास पूर्ण झाल्यात. याआधी मोदींचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना शाळेत दाखवला जायचा. मात्र याबाबत शिक्षण विभागाकडून त्या संदर्भात अद्याप कोणत्याही सूचना नाहीत. त्यामुळे परीक्षा पे चर्चा आयोजनाचा महाराष्ट्राचा विचार केला तर चर्चेचा टाइमिंग चुकल्याची चर्चा आहे.


















