(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pravin Lonkar Pune : लोणकरचा पुण्यातल्या वारजेत डेअरी आणि भंगारचा व्यवसाय
Pravin Lonkar Pune : लोणकरचा पुण्यातल्या वारजेत डेअरी आणि भंगारचा व्यवसाय
हेही वाचा :
महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि तीन वेळा आमदार राहिलेले बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची त्यांच्याच मतदारसंघात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सिद्दिकी यांच्या हत्येमागे बिश्नोई गँग (Lawrence Bishnoi Gang) असल्याचा दावा एका फेसबुक पोस्टमधून (Facebook Post) करण्यात आला आहे. याची सखोल चौकशी सध्या सुरू आहे. गोळ्या घालणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. तर, तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या निर्दयी हत्येचा निषेध संपूर्ण देशभरातून करण्यात येतोय. तसेच, एवढ्या मोठ्या नेत्याची हत्या होते, मग राज्यातील जनता किती सुरक्षित? अशी टीका विरोधकांनी महायुती सरकावर केली आहे. दरम्यान, या सर्व गदारोळात थेट गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला एका अपक्ष खासदारानं खुलं आव्हान दिलं आहे.