एक्स्प्लोर
Rain Fury: 'डोळ्यादेखत पीक गेलं', Bhandara मध्ये परतीच्या पावसाने भात शेतकरी हवालदिल
भंडारा (Bhandara) जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भात उत्पादक शेतकरी (Paddy Farmers) मोठ्या संकटात सापडले आहेत. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिकं वाया गेली आहेत. 'कापणी केलेलं भाताचं पीक पाण्याखाली गेल्यानं मोठं नुकसान झालंय,' अशी व्यथा शेतकरी मांडत आहेत. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कापणी करून ठेवलेले भाताचे पीक (Paddy Crop) पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. आधीच अतिवृष्टी आणि कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना या परतीच्या पावसाने आणखी हवालदिल केले आहे. जर पावसाचा जोर कायम राहिला तर उरले सुरले पीकही हातातून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement

















