(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pooja Khedkar Case : यूपीएससी निर्णयाला पूजा खेडकरांचं दिल्ली हायकोर्टात आव्हान
Pooja Khedkar Case : यूपीएससी निर्णयाला पूजा खेडकरांचं दिल्ली हायकोर्टात आव्हान
भारतीय लोकसेवा आयोगाकडून (Public service commissions in India) कारवाई करण्यात आलेल्या पूजा खेडकरनं (Pooja Khedkar) यूपीएससीच्या निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) धाव घेतली आहे. पूजा खेडकरनं यूपीएससीच्या (UPSC) निर्णयाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
दरम्यान, यूपीएससीनं पूजा खेडकरची उमेदवारी रद्द केली होती. तसेच, त्यांना शो कॉज नोटीस बजावली होती. युपीएससीच्या याच निर्णयाविरोधात पूजा खेडकर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
UPSC नं उमेदवारी केली रद्द
यूपीएससीनं पूजा खेडकरला दोषी ठरवलं असून UPSC नं पूजा मनोरमा दिलीप खेडकरची उमेदवारी रद्द केली. तसेच, यूपीएससीनं भविष्यातील सर्व परीक्षा/निवडींमधून पूजा खेडकरला कायमचं काढून टाकलं. पूजा खेडकरला 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यांचं उत्तर न मिळाल्यानं यूपीएससीनं ही कारवाई केली आहे.
पूजा खेडकरवर यूपीएससीनं कारवाई केल्यानंतर आता पोलीस त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरने यूपीएससीमध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यूपीएससीनं आता पूजा खेडकरचं पद काढून घेतलं असून त्यांना भविष्यात कोणतीही परीक्षा देण्यात येणार नाही.
UPSC ने काय म्हटलंय?
UPSC सन 2009 ते 2023 या दरम्यान पंधरा हजारांहून अधिक शिफारस केलेल्या उमेदवारांच्या CSE डेटाच्या आढावा घेतला. त्यामध्ये उपलब्ध नोंदींच्या तपासणीनंतर UPSC ला पूजा खेडकर या CSE-2022 नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळल्या.