MLC Elections : राजकीय निवडणुका या वैयक्तिक पातळीवर होऊ नये : सतेज पाटील यांची प्रतिक्रिया
कोल्हापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी माघार घेतल्याने सतेज पाटील दुसऱ्यांदा विधान परिषदेचे आमदार झालेत.यावेळी सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व नेत्यांचे आभार मानले. अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांचे देखील आभार सतेज पाटील यांनी मानले. राजकीय निवडणुका या वैयक्तिक पातळीवर होऊ नयेत. असंही यावेळी सतेज पाटील यांनी बोलून दाखवले. तर सतेज पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी महाडिक कुटुंबीयांनी उमेदवारी अर्ज घेताना पक्षाचा आदेश म्हणून निवडणुकीतून माघार घेतल्याचे सांगितले. जिल्ह्यावर महाडिक कुटुंबीयांचे वर्चस्व होते आणि यापुढे देखील राहील असं धनंजय महाडिक यांनी बोलून दाखवलं. जिल्ह्यात सलोख्याचे वातावरण निर्माण व्हावे अशा पद्धतीचे संकेत देखील महाडीक कुटुंबीयांनी दिले आहेत.सतेज पाटील यांची निवड झाल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी महाडिक कुटुंबीय आणि पाटील कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त केली.



















