Nashik : मोदींच्या दौऱ्यातून नाशिककरांना काय मिळालं? Namdev Maharaj Shastri यांची प्रतिक्रिया
Nashik PM Narendra Modi : मोदींच्या नाशिक दौऱ्यातून नाशिककरांना काय मिळालं ? Tushar Bhosle आणि Namdev Maharaj Shastri यांची प्रतिक्रिया
मुंबई : पंतप्रधान मोदींनी (PM Modi) आज काळाराम मंदिरात ( स्वच्छताही केली. 22 जानेवारीला होणाऱ्या राममंदिर सोहळ्याआधी देशातल्या सर्व मंदिरात स्वच्छता मोहिम राबवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी याआधीच केलं होतं. त्यानुसार काळाराम मंदिरात पंतप्रधानांनी पूजन झाल्यावर हाती झाडू घेत स्वच्छता केली. तसेच देशातील युवकांना स्थानिक उत्पादने वापरण्याचा सल्ला दिला आहे. तसेच मद्यपानापासून दूर राहा, ड्रग्जच्या आहारी जाऊ नका आणि आई बहिणींवरून अपशब्द वापरणे बंद करा, असा सल्ला मोदींनी तरूणांना दिला आहे. जाणून घेऊया मोदींच्या भाषणातील मुख्य दहा मुद्दे जाणून घेऊया.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे युवकांचे तीन मंत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील युवकांना तीन मंत्र दिले आहेत. व स्थानिक वस्तूंचा जास्तीत वापर करा. देशातील प्रत्येक तरुण त्यांच्या निष्ठेने सशक्त आणि सक्षम भारतासाठी प्रयत्न करेल, हा मला विश्वास आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.























