एक्स्प्लोर
Pappu Politics: 'शेलारांनी नकळत फडणवीसांनाच पप्पू ठरवलं', Uddhav Thackeray यांचा टोला
महाराष्ट्राच्या राजकारणात 'पप्पू' कोण यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं आहे. 'शेलारांनी नकळत देवेंद्र फडणवीसांनाच पप्पू ठरवलेलं आहे,' असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. कथित मतदारयादीतील घोटाळ्यावरून आदित्य ठाकरेंनी केलेल्या सादरीकरणानंतर, फडणवीसांनी 'महाराष्ट्राचा पप्पू बनू नये' असा टोमणा मारत आदित्य यांची तुलना राहुल गांधींशी (Rahul Gandhi) केली होती. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी दिल्लीपासून गल्लीतील पप्पूंचा पर्दाफाश करणार असल्याचे म्हटले, ज्याला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी शेलारांनी फडणवीसांनाच लक्ष्य केल्याचा दावा केला. यानंतर शेलारांनी, 'उद्धव ठाकरेंनी आपणच पप्पूचे पापा आहोत हे मान्य केले' असे म्हणत, दुबार मतदार याद्यांमधील मुस्लिम समाजाची नावे जाहीर करण्याचे आव्हान ठाकरेंना दिले.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
सांगली
राजकारण
Advertisement
Advertisement

















