Pankaja Munde Full Speech :राम भाऊ किती हळवे आहेत?पंकजा मुंडेंनी त्या भावनिक क्षणाचा किस्सा सांगितला
Pankaja Munde Full Speech :राम भाऊ किती हळवे आहेत?पंकजा मुंडेंनी त्या भावनिक क्षणाचा किस्सा सांगितला
हेही वाचा :
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा (Maharashtra Assembly Winter Session 2024) आज चौथा दिवस आहे. विधानपरिषदेमध्ये आज सभापतीपदाचा प्रस्ताव सादर करण्यात आला. भाजपचे आमदार आणि माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) यांची विधानपरिषद सभापतीपदी एकमताने निवड करण्यात आली. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाषण करताना भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना जोरदार टोला लगावला. "गिरीश आता तरी सुधार, आता तरी सुधार, कट होता होता वाचलास तू", असे अजित पवारांनी म्हणताच विधानपरिषदेत एकच हशा पिकल्याचे दिसून आले.
राम शिंदे यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती म्हणून निवड करण्यात यावी यासंबंधीचा प्रस्ताव आज श्रीकांत भारतीय यांनी विधान परिषद सभागृहात मांडला. या प्रस्तावाला विधान परिषदेच्या सदस्य मनीषा कायंदे तसेच अमोल मिटकरी, शिवाजी गर्जे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले. यानंतर आवाजी मतदानातून राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषणे झाली. यावेळी अजित म्हणाले की, या विधानसभेचे वैशिष्ट्य पाहिले तर अनेक तरुण आमदार निवडून आले आहेत. विधानसभेचे अध्यक्ष देखील तरुण आहेत तर परिषदेत देखील तरुण सभापती बसवले आहेत. याआधी मुख्यमंत्र्यांनी आपल्याबद्दल सांगितले. मात्र, आपण अजूनही चाळीशीत आहात, असेच वाटत असल्याचे त्यांनी म्हटले.