एक्स्प्लोर
Pandharpur Yatra: मराठवाडा, विदर्भावर अतिवृष्टीचं सावट, कार्तिकी यात्रेडे भाविकांनी फिरवली पाठ
पंढरपूरमधील (Pandharpur) कार्तिकी यात्रेवर (Kartiki Yatra) अतिवृष्टी आणि महापुराचे (Floods) सावट पसरले आहे. कार्तिक शुद्ध दशमीनिमित्त मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातून हजारो भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. मात्र, अतिवृष्टी आणि महापुराचा मोठा फटका बसलेल्या मराठवाडा आणि विदर्भामधल्या भाविकांनी यंदाच्या वारीकडे पाठ फिरवल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. अतिवृष्टीमुळे या भागांतील शेतीचे मोठे नुकसान झाले असून, अनेक गावे पाण्याखाली गेली होती, ज्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. एकीकडे पश्चिम महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या गर्दीने चंद्रभागेचा तीर फुलून गेला असताना, दुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भातील दिंड्यांची संख्या घटल्याने यात्रेवर संकटाचे सावट असल्याचे दिसून येते.
महाराष्ट्र
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Nilesh Rane on Konkan Road : कंत्राटदार, अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करा, कोकणाचे रस्ते नीट करा
Ambadas Danve PC : आमदाराचा नोटांची जाडजुड बंडलं मोजतानाचा VIDEO; अंबादास दानवेंनी सगळच काढलं
Ambadas Danve vs Mahendra Dalvi : अंबादास दानवेंचा 'कॅश बॉम्ब'; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Mahendra Dalvi on Ambadas Danve : ब्लॅकमेल करणं दानवेंचा धंदा, संपूर्ण व्हिडीओ दाखवा, पुरावे द्या
आणखी पाहा
Advertisement
Advertisement




















