Palghar : मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका नाकारल्याचा आरोप, मोखाडा तालुक्यातील घटना
रुग्णवाहिका नाकारल्यानं एका चिमुकल्याचा मृतदेह बाईकवरुन न्यावा लागल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय..पालघर जिल्ह्यातल्या मोखाडा तालुक्यातल्या पायरवाडी इथं ही घटना घडलीय..
पहिलीत शिकणाऱ्या ६ वर्षीय अजय युवराज पारधी याला दोन दिवसांपूर्वी ताप आला होता ..२४ तारखेला त्याच्या आईवडिलांना त्याला एका खासगी दवाखान्यात दाखल केलं..पण अजयला सरकारी रुग्णालयात नेण्याचा सल्ला तिथल्या डॉक्टरांनी दिला..
त्यानंतर अजय पारधी याला जव्हार इथल्या कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आलं..पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला..
परंतु आर्थिक चणचणीत असलेल्या या कुटुंबाला मृत्यदेह आता घरी न्यायचा कसा ? असा प्रश्न पडला..
कुटुंबानं रुग्णवाहिकेसाठी विचारपूस केली..मात्र पैसे असतील तरच रुग्णवाहिका मिळेल असं सांगण्यात आलं..शेवटी दुचाकीवरुन चिमुकल्याचा मृतदेह त्याच्या गावी नेण्यात आला..



















