Final Year Exams | 31 ऑक्टोबरपूर्वी अंतिम वर्षाच्या परीक्षांचा निकाल लावण्याचं लक्ष्य, परीक्षा कशी होणार?
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आता अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्याच लागतील हे स्पष्ट झालं आहे. त्यासाठी सुप्रीम कोर्टाने डेडलाईनही आखून दिली आहे. परीक्षा होणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता परीक्षा घ्यायची कशी असा प्रश्न प्रशासन आणि विद्यापिठांसमोर आहे. तर दुसरीकडे परीक्षेच्या आधी पण परीक्षेच्याच संदर्भातले काही मोठे विद्यार्थ्यांसमोर ऊभे राहिले आहेत. "विद्यार्थ्यांना सेंटरवर एकत्र न बोलावता, घरुनच परीक्षा देता येईल असं आश्वासन विद्यापिठांकडून देण्यात आल्याने विद्यार्थी थोडे रिलॅक्स झाले आहेत. पण दुसरा मोठा प्रश्न हा पुस्तकांचा निर्माण झाला आहे. अभ्यास करणार कसा?" असा प्रश्न स्टूडंट वेल्फेअर असोसिएशनकडून वैभव एडके यांनी विचारला.





















