महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गांच्या कामात अडचणी;Nitin Gadkari यांचं CM Uddhav Thackeray यांना पत्र
राज्यातल्या महामार्गांच्या स्थितीविषयी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीलंय.. राज्यात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे अनेक कामं सुरू आहेत. मात्र अनेक प्रकल्पांच्या कामात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शिवसेनेचे कार्यकर्ते अडचणी आणत असल्याचं गडकरींनी या पत्रात नमूद केलं आहे. हे लोकप्रतिनिधी नियमबाह्य मागण्या करत अधिकारी आणि कंत्राटदारांना काम करण्यापासून रोखत असल्याचं गडकरींनी या पत्रात म्हटलंय. ही कामं वेळेत पूर्ण झाली नाही तर प्रोजेक्टची किंमत वाढण्याची भीती आहे. त्यामुळे या सगळ्यात स्वतः उद्धव ठाकरेंनी लक्ष घालून शिवसेना कार्यकर्त्यांना समज द्यावी अशी विनंती नितीन गडकरींनी केली आहे.



















