Nashik सावरपाड्यातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद,माझाच्या बातमीनंतर जीवघेणा प्रवास थांबणार
खरशेत ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सावरपाडा मधिल आदिवासी महिलांचा पाण्यासाठीचा जीवघेणा प्रवास, लहान मुलांचा थरकाप उडविणारा संघर्ष एबीपी माझान उभ्या महाराष्ट्र समोर मांडला, या वृत्राची दखल पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली. सावरपाडामध्ये जाऊन उपाय योजना करण्याच्या सूचना शिवसैनिकांना दिल्यात त्यानंतर नाशिक आणि मुंबईच्या शिवसैनिकानी आदेशाची अंमलबजावणी करत अवघ्या दोन दिवसात तास नदीवर 30 बाय 4 फुटांचा लोखंडी पूल बसविण्याचे काम सुरू झालं. स्थानिकांना दिलासा मिळाला आहे, स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले तरीही नदी ओलांडण्यासाठी पूल नव्हता पिढया न पिढया जीवघेणी कसरत सुरू होती ती समस्या आज दूर झालीय.
महत्त्वाच्या बातम्या























