Narendra Bhondekar on Vidhan Sabha | शिंदे समर्थक अपक्ष आमदार महायुतीला धक्का देणार?
Narendra Bhondekar on Vidhan Sabha | शिंदे समर्थक अपक्ष आमदार महायुतीला धक्का देणार?
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीनं अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत* *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याला झुकतं माप दिलं नाही* *भाजपानं घेतलेल्या ठरावानं मैत्रिपूर्ण लढत लढण्याची भोंडेकर यांचा निर्णय* *आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी महायुतीवर साधला निशाणा* Anchor : महाराष्ट्रात सत्ता बदल झालं तेव्हा एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांमध्ये भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा अग्रक्रम होता. अडीच वर्ष महायुती सोबत राहिल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या सरकारनं भंडाऱ्याच्या आमदारांची इच्छा पूर्ण केलेली नाही. त्यामुळेचं भंडाऱ्याचे आमदार भोंडेकर हे महायुतीवर नाराज असून शिवसेनेची उमेदवारी नं घेता ते अपक्ष निवडणूक लढण्याच्या मानसिकतेत आहेत. मंत्रीपद असो किंवा महामंडळ याची अपेक्षा असताना महायुतीनं मात्र भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना डावललं. त्यामुळेचं भोंडेकर आता महायुतीवर नाराज आहेत. भंडाऱ्यात कार्यकर्ता, पदाधिकारी आणि बूथ प्रमुखांचा मेळावा घेत त्यांनी ही नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री शिंदे आणि महायुतीने भंडारा जिल्ह्याला झुकतं माप दिलं नाही.....त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. असं असताना भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात उजेदावर देण्याचा ठराव घेतल्यानं भोंडेकर महायुतीवर प्रचंड नाराज आहेत. त्यामुळं ते आता महायुतीतून बाहेर पडून महायुतीची उमेदवारी नं घेता अपक्ष निवडणूक लढायच्या मानसिकतेत आहेत. याबाबत त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी.....