Narayan Rane यांच्या दौऱ्याची कोकणात जय्यत तयारी, राणेंच्या स्वागतासाठी लावले ट्रकभर बॅनर्स!
केंद्रीय मंत्री झालेल्या नारायण राणेंची आजपासून जनआशीर्वाद यात्रा सुर होतेय. भाजपच्या इतर नेत्यांच्या जनआशीर्वाद यात्रांपेक्षा राणेंच्या यात्रेची जास्त चर्चा आहे. कारण राणेंच्या यात्रेचा रथ शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून जाणार आहे. विशेष म्हणजे जनआशीर्वाद यात्रेदरम्यान नारायण राणे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्याचा राणेंना नैतिक अधिकार नसल्याची टीका शिवसेनेच्या नेत्यांनी केलीय. त्यामुळं राणे आणि शिवसेना, या दोघांच्या भूमिकेकडे आज लक्ष असणार आहे. दरम्यान मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, शिवसेनेवर प्रहार करण्यासाठी भाजपकडून राणेंच्या जनआशीर्वाद यात्रेची रुपरेषा आखण्यात आल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.






















