Nanded: 5 महिन्यांपूर्वी उद्घाटन, आता दयनीय अवस्था, कुठे भेगा कुठे छताला तडा ABP Majha
उर्दू भाषेच्या प्रसारासाठी नांदेडमध्ये बांधण्यात आलेल्या उर्दू घर या इमारतीचं बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचं असल्याचं समोर आले. अवग्या सहा महिन्यात या इमारतीला जागोजागी भेगा पडल्याचं दिसून आलेय. आधीच ही इमारत तयार होण्यासा बराच कालावधी लागला होता. इमारत बांधून झाल्यानंतर या इमारतीचं उद्घाटनही बराच काळ पुढे ढकललं जात होतं. मात्र अखेरीस सहा महिन्यांपूर्वी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते या उर्दू घरचं उद्घाटन झालं मात्र त्यानंतर लगेचच या इमारतीच्या बांधकामाचा दर्जा समोर आलाय. या इमारतीचा मुख्य ढाचा असलेल्या घुमटालाही तडे गेलेले आहेत. तसच घुमट आणि भिंतींचं प्लास्टरही अनेक ठिकाणी गळून पडलंय त्यामुळे उद्घाटनानंतर अवघ्या सहा महिन्यांत ही इमारत धोकादायक बनलेय.
महत्त्वाच्या बातम्या























