Nana Patole : विशाळगड प्रकरणी जातीय तेढ निर्माण केला जातोय याला गृहमंत्र्यांचा पाठिंबा
Nana Patole : विशाळगड प्रकरणी जातीय तेढ निर्माण केला जातोय याला गृहमंत्र्यांचा पाठिंबा
हे देखील वाचा
IAS Pooja Khedkar : आधी UPSCची नोटीस, नंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या पीएनी घेतली पूजा खेडकरांची भेट; नेमकी चर्चा काय झाली?
वाशिम: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरांना (IAS Pooja Khedkar) यूपीएससीची नोटीस (UPSC) आल्यानंतर काही वेळातच वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांचे पीए धर्मराज चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली. ही भेट कार्यालयीन कामासाठी असून त्याची माहिती आपण देऊ शकत नसल्याची प्रतिक्रिया धर्मराज चव्हाण यांनी दिली. त्यामुळे यूपीएससीची नोटीस आणि त्यानंतर झालेली ही भेट यामध्ये खरंच काही योगायोग आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पूजा खेडकर या शिमधील शासकीय विश्रामगृहातील खोलीमध्ये बंद आहेत. गेल्या गेल्या तीन दिवसांपासून त्या खोलीत बंद असून कुणाशीही त्या संपर्क करत नाहीत.
वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर सध्या वाशिमच्या शासकीय विश्रामगृहातील'गोदावरी' या खोलीत मुक्कामी आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने पूजा खेडकर यांना नोटीस बजावत आपण सादर केलेली दस्तावेज खोटी असल्याचा आरोप होत असून आपणांवर कारवाई का करण्यात येऊ नये अशा पद्धतीची नोटीस बजावली आहे.