Nana Patole Vs Dhananjay Munde : शेतकऱ्यांना कर्ज वाटपावरून नाना पटोले धनंजय मुंडेंमध्ये खडाजंगी
Nana Patole Vs Dhananjay Munde : शेतकऱ्यांना कर्ज वाटपावरून नाना पटोले धनंजय मुंडेंमध्ये खडाजंगी
महाराष्ट्रभर पावसामुळे वातावरण गारेगार झालेलं असलं तरी, विधानसभेत मात्र ऐन पावसाळी अधिवेशनात खडाजंगीचा पाऊस पडला आणि वातावरण तापलं. ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांचा पदरी बोगस बियाणं पडत असल्याचा तसेच बँका शेतकरऱ्यांना दारात उभं करत नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्याला कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलंय. त्याचसोबत महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेवरूनही पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारला धारेवर धरलंय. त्याचप्रमाणे, आमदारांवर कोर्टाने घातलेल्या निर्बंधांचा मुद्दा आशिष शेलार यांनी उपस्थित केला. तर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी बोलू दिलं जात नसल्याचा गंभीर आरोप केला. त्याला फडणवीसांनी दिलेल्या उत्तराने सभागृहात खसखस पिकली. दरम्यान, वंदे मातरम् म्हणण्यावरूनही अबू आझमी आणि फडणवीसांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. एकूणच, अधिवेशनाचा आजचा दिवस खडाजंगी आणि खडाखडीने गाजला.