Nana Kate on Maval| बंडखोरी मागे घ्यावी का? हाच नियम मावळमध्ये भाजपाने पाळावा, नाना काटेंचा नवा डाव
Nana Kate on Maval| बंडखोरी मागे घ्यावी का? हाच नियम मावळमध्ये भाजपाने पाळावा, नाना काटेंचा नवा डाव
अर्ज मागे घ्यायला काही तास उरले असताना चिंचवडमधील बंडखोर उमेदवार नाना काटेंनी नवा डाव टाकलाय. मी बंडखोरी मागे घ्यावी असं वाटत असेल तर मावळमध्ये भाजपाने बंडखोर बापू भेगडेंना दिलेला पाठिंबा काढून घ्यावा, असं म्हणत नाना काटेंनी भाजपाला कोंडीत पकडले आहे. भाजपचे शंकर जगताप आणि शरद पवार गटाचे राहुल कलाटे यांच्याविरोधात काटे यांनी बंडखोरी केलीये. त्यामुळं शरद पवार आणि अजित पवारांकडून त्यांची मनधरणी सुरु आहे. अशातच काटे यांनी मावळ विधानसभेचा संदर्भ देत, नवी खेळी केलीये. त्यामुळं दुपारी तीन वाजेपर्यंत नेमकं काय घडतं? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय नाजिम मुल्ला यांनी.





















