राष्ट्रवादीचा नागपुरात फडणवीसांच्या घरावर मोर्चा, निमगडे हत्या प्रकरणावरुन राष्ट्रवादी आक्रमक
सहा सप्टेंबर 2016 रोजी नागपुरात घडलेल्या एकनाथ निमगडे हत्या प्रकरणात भाजपच्या काही लोकांचा हात आहे असा खळबळजनक आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळ मोर्चाच्या स्वरूपात आले आहेत सुमारे पंचवीस कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी सुरू करत त्यांच्या घराकडे जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे
एकनाथ पिंगळे हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत होतं मात्र काही दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांनी या प्रकरणात नागपूरच्या कुख्यात गुंड रणजीत सफेलकर आणि त्याचा सहकारी कालू हाटे आणि त्यांच्या गुंडांचा हात असल्याचा उलगडा केला होता या प्रकरणात 11 आरोपी बनविण्यात आले असून त्यापैकी तीन ते चार जणांना अटक करण्यात आली आहे मात्र मुख्य आरोपी रंजीत चाफेकर आणि कालू पहाटे अद्याप फरार आहेत





















