(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagar Panchayat Elections 2022 : नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर, पाहा कोणत्या क्रमांकवर कोण आहे
नगरपंचायतींच्या निवडणुकीत सत्त्ताधारी आघाडीत राष्ट्रवादीनं शिवसेना आणि काँग्रेसला मागे टाकून पहिल्या क्रमांकासाठी भाजपबरोबर स्पर्धा केली. राष्ट्रवादीच्या या यशामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीतील तीन पक्षांत राष्ट्रवादी मोठा भाऊ होत असल्याची चर्चा सुरु झालीय. राज्यातल्या 25 नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसनं सत्ता स्थापन केलीय...तर 24 नगरपंचायतींवर झेंडा फडकवत भाजप दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष ठरलाय.. काँग्रेसनं 18तर शिवसेनेनं 14 नगरपंचायती ताब्यात घेतल्या आहेत.. 16जागांवर स्थानिक आघाड्यांनी यश मिळवलंय.. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदी असताना या निवडणुकीत शिवसेनेला सर्वात कमी जागा मिळाल्या. काँग्रेसलाही शिवसेनेपेक्षा अधिक जागा मिळाल्या. याचीही चर्चा निकालानंतर सुरु आहे. विशेषतः दोन्ही पक्षांना मागे टाकून राष्ट्रवादीनं बाजी मारल्यानं आघाडीत हा पक्ष आता नंबर वनकडे जात असल्याची चर्चा सुरु झालीय.