Murlidhar Mohol Taking Oath : मुरलीधर मोहोळ यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ ABP Majha
Murlidhar Mohol Taking Oath : मुरलीधर मोहोळ यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ ABP Majha नवी दिल्ली : आजपासून अठराव्या लोकसभेच्या पहिल्या संसदीय अधिवेशनाला (18th Lok Sabha First Session) सुरुवात होणार आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकांचे (Lok Sabha Election Result 2024) निकाल जाहीर झाल्यानंतर देशात सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार (NDA Government) सत्तेत आलं. त्यानंतर 9 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदींसह मोंदींच्या मंत्रिमंडळातील (Mondi Cabinet) मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. आज खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी-कॅबिनेट मंत्र्यांसह 280 खासदार शपथ घेतील. देशाच्या 18व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. आज सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत पहिल्याच दिवशी पंतप्रधान मोदी-कॅबिनेट मंत्र्यांसह 280 खासदार शपथ घेणार आहेत. सकाळी 11 वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातले पाच मंत्री आणि 14 खासदार आज राष्ट्रपतींच्या उपस्थितीत शपथ घेणार आहेत. सकाळी 11 ते 1 या वेळेत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मंगळवारी उरलेल्या 29 खासदारांचा शपथविधी सकाळी 11 ते 12 या वेळेत होणार आहे.



















