एक्स्प्लोर
School Reopen करण्याबाबत महापालिका अनुकूल, मुलांच्या लसीकरणानंतर शाळा सुरू कराव्यात: टास्क फोर्स
मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती आता नियंत्रणामध्ये आल्याचं दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारने अनेक गोष्टी सुरु केल्या आहेत. त्यावर आता मुंबईतील शाळा सुरु करण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासन अनुकूल आहे. पण लहान मुलांच्या लसीकरणानंतरच शाळा सुरु कराव्यात असा कोविड टास्क फोर्सचा आग्रह आहे.
मुंबईमध्ये पहिली ते आठवीचे वर्ग सुरु करण्याकरता मुंबई महापालिकेनं तयारी दर्शवली आहे. तसं राज्य सरकारलाही कळवण्यात आलं आहे. शाळा सुरु झाल्यानंतर कोविड रुग्णसंख्या वाढलीच तरी महापालिका प्रशासन पूर्ण सक्षम आहे असे महापालिकेनं राज्य सरकारला कळवलं आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















