एक्स्प्लोर

Gopal Badne Phaltan: डॉक्टर तरुणीच्या शारीरिक छळाचा आरोप असलेल्या गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला....

Phaltan Doctor girl Suicide news: पीएसआय गोपाळ बदने हा डॉक्टर तरुणीवर आरोपींच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठी दबाव आणायचा, असे तक्रारीत म्हटले आहे. तरुणीवर चारवेळा अत्याचार.

Phaltan Doctor girl Suicide news: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेला फलटण पोलीस दलातील पोलीस उपमहानिरीक्षक गोपाळ बदने (Gopal Badne) याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. गेल्या काही तासांपासून पोलीस (Satara Police) गोपाळ बदनेच्या मागावर होते. मात्र, तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अखेर शनिवारी रात्री गोपाळ बदने याने स्वत:हून फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. यानंतर पोलिसांकडून त्याला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. गोपाळ बदने याला आज न्यायालयात हजर केले जाऊ शकते. दरम्यान, गोपाळ बदने याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. मी प्रामाणिक आहे. न्यायालय जो काही निर्णय देईल त्यावर माझा विश्वास आहे. माझा पोलीस प्रशासनावरही विश्वास आहे, असे गोपाळ बदने याने म्हटले. (Satara Crime news)

मृत डॉक्टर तरुणीने फलटणमधील एका नामांकित हॉटेलच्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्या हातावर काही मजकूर लिहला होता. यामध्ये पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर हे दोघे आपल्या आत्महत्येसाठी कारणीभूत असल्याचे डॉक्टर तरुणीने म्हटले होते. तसेच गोपाळ बदने याने आपल्यावर चारवेळा बलात्कार केल्याचेही या सुसाईड नोटमध्ये म्हटले होते. त्यामुळे फलटण पोलीस गोपाळ बदनेच्या मागावर होते. मात्र, गोपाळ बदने त्यांना गुंगारा देत फिरत होता. त्याचे शेवटचे मोबाईल लोकेशन पंढरपूर येथे आढळून आले होते. त्यानंतर गोपाळ बदने याने मोबाईल बंद केला होता. मोबाईल लोकेशनचा आधार घेऊन बीड, पुणे आणि पंढरपूर भागात सातारा पोलिसांकडून शोधमोहीम सुरु होती. अनेक तास उलटूनही गोपाळ बदने पोलिसांच्या हाती लागत नसल्याने उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या.  परंतु, शनिवारी रात्री गोपाळ बदने स्वत:हून फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर झाला. आता त्याच्या चौकशीतून कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

दरम्यान, या प्रकरणातील दुसरा आरोपी प्रशांत बनकर याला पोलिसांनी शनिवारीच अटक केली होती. प्रशांत बनकर याला फलटण येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाकडून प्रशांत बनकर याला चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यामुळे आता या दोघांच्या चौकशीतून डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येविषयी कोणती नवीन माहिती समोर येणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल.

आणखी वाचा

फलटणमधील महिला डॉक्टरवर पोलीस अधिकाऱ्याकडून अत्याचार, शेवटचा कॉल कोणाचा, 'तो' खासदार संशयाच्या भोवऱ्यात, वाचा स्टार्ट टू एंड स्टोरी

गोपाळ बदने महिलांची छेड काढायचा, डोळा मारायचा, तक्रार केल्यास पैसे मागायचा; डॉक्टर तरूणीच्या प्रकरणात आरोपी पोलिस उपनिरीक्षकावर गंभीर आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Mahapalika : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले उद्धव कांबळे माझावर, म्हणाले मीच आहे उमेदवार!
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
Lay Bhari Award 2025 : लय भारी पुरस्कार 2025
Rahul Narvekar On Election : पराभव दिसू लागल्यानं राऊतांचे बिनबुडाचे आरोप, नार्वेकरांची टीका
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
मोठी बातमी : तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
तिकीट नाकारल्यानंतर नरेश म्हस्केंचा मुलगा रोखठोक बोलला, म्हणाला, हट्टी मुलाचं ऐकलं जातं, पण....
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
पुण्यातील पूजा मोरे ओक्साबोक्शी रडल्या, उमेदवारी मागे घेताना पतीलाही अश्रू अनावर; भाजपात हायव्होल्टेज ड्रामा
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
शिंदेंच्या शिवसेनेतही मोठी घराणेशाही; मुंबई महापालिकेसाठी अनेक आमदार-खासदारांच्या मुलांना उमेदवारी
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
अशोक चव्हाणांनी 50 लाख घेऊन तिकीट दिलं, माजी नगरसेवकाचा आरोप; लातूरमध्येही निष्ठावंतांकडून बंडाचे निशाण
Gold Rate : गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
गुड न्यूज, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने- चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Marathi Sahitya Sammelan: विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
विश्वास पाटील माफी मागा, अन्यथा मराठी साहित्य संमेलन उधळून लावू; संभाजी ब्रिगेडच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीची बैठक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
KDMC मध्ये महायुतीची घोडदौड, 9 उमेदवार बिनविरोध, रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचाही मास्टरस्ट्रोक
Embed widget