एक्स्प्लोर
Mumbai Metro Line 3 | पश्चिम उपनगरातून Colaba पर्यंत थेट प्रवास, 27 Stations
मुंबई मेट्रो प्रकल्प तीन आता सुरू झाला आहे. ही भुयारी मेट्रो असून, पश्चिम उपनगरातून थेट कुलाब्यापर्यंत जाण्यासाठी ती वरदान ठरणार आहे. या मेट्रोचे डिझाईन अतिशय उत्कृष्ट असून, आसन व्यवस्था परदेशातील मेट्रोप्रमाणे सुंदर आहे. साधारणपणे 33 किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे. या मार्गामुळे प्रवासासाठी अतिशय कमी वेळ लागणार आहे. नागरिकांना साधारणपणे एक तासामध्ये त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचता येणार आहे. या संपूर्ण मार्गावर एकूण 27 स्थानके आहेत. या मेट्रोसाठी किमान भाडे 10 रुपये तर कमाल भाडे 70 रुपये आकारण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी एकूण 37,270 कोटी रुपये खर्च झाले आहेत. यामुळे मुंबईकरांना जलद आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















