Monsoon : यंदा मान्सूनला उशिर, केरळात 1 जूनमध्ये येणारा मान्सून 9 जूनला दाखल होण्याची शक्यता
मान्सूनच्या आगमनाला यंदा उशिर झालाय. दरवर्षी साधारणात एक 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो. यंदा 9 जूनला म्हणजेच उद्या मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय. 'बिपरजॉय' चक्रीवादळ तीव्र होत असतानाच हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय. मान्सून केरळात दाखल होण्याची अनुकूल परिस्थिती आता निर्माण झाली आहे. पुढील 24 तासांत बिपारजॉय तीव्र चक्रीवादळाचे अतितीव्र चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील मान्सूनच्या आगमनाला फटका बसणार. आज कोकणात तर उद्या विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या




















