एक्स्प्लोर
MNS vs Govt: 'दुसऱ्यांचे कार्यक्रम आपलेच दाखवण्यापर्यंत सरकार जाईल वाटलं नव्हतं', दीपोत्सवावरून मनसे संतापली
शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील मनसे आयोजित दीपोत्सवाच्या (Deepotsav) व्हिडिओवरून नवा वाद पेटला आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाने (Maharashtra Tourism) दीपोत्सवाचा व्हिडिओ प्रसिद्ध करताना मनसे (MNS) किंवा राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नावाचा उल्लेख टाळल्याने मनसे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. 'दुसऱ्यांचे चांगले कार्यक्रम सुद्धा आपलेच आहेत हे दाखवण्यापर्यंत सरकार जाईल असे वाटले नव्हते,' अशा शब्दांत मनसेने आपली नाराजी व्यक्त केली आहे. गेली १३ वर्षे मनसे हा दीपोत्सव आयोजित करत असून, तो अराजकीय ठेवण्याचा प्रयत्न असतो, असे पक्षाने म्हटले आहे. सरकारने याचं श्रेय मनसेला दिलं असतं तर मनाचा मोठेपणा दिसला असता, पण तसे झाले नाही, हा सरकारचा कद्रूपणा असल्याची टीका मनसेने केली आहे. यापूर्वी नाशिकमध्येही मनसेने केलेल्या कामाचे श्रेय तत्कालीन सरकारने घेतल्याचा आरोपही पक्षाने केला आहे. पर्यटन विभागाने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















