MLC Elections : शिक्षक-पदवीधर निवडणुकीची मतमोजणी जवळपास पूर्ण, कुठे कोण विजयी? ABP Majha
राज्याचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी जवळपास पूर्ण झालीए.... अमरावती वगळता इतर चार जागांचे निकाल हाती आलेले आहेत... या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसलाय. कारण पाचपैकी दोन जागी भाजपच्या पदरात पराभवाची धूळ पडलीय.. . नागपुरात भाजपचा गड भेदत काँग्रेसचे सुधाकर अडबाले विजयी झाले तर भाजपचे उमेदवार नागो गाणार यांचा पराभव झालाय... तर औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीचे विक्रम काळे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या किरण पाटील यांचा 6 हजार 992 मतांनी पराभव केलाय... दुसरीकडे अमरावतीत मात्र काँटे की टक्कर पाहायला मिळतेय... अमरावतीत मविआचे उमेदवार धीरज लिंगाडे चौथ्या फेरीपर्यंत 2 हजारांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत...























