एक्स्प्लोर
Maharashtra Politics: ‘कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय कळवू’, Dilip Mane यांच्या भूमिकेने राजकीय वर्तुळात खळबळ
सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ‘कार्यकर्त्यांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांना आमचा निर्णय कळवू’, असे सूचक विधान दिलीप माने यांनी केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात आणि मतदारसंघात कामे होत असल्याने जयकुमार गोरे आणि सचिन कल्याण शेट्टी यांची भूमिका योग्य असल्याचे माने म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. या भेटीमुळे दिलीप माने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, त्यांच्या या संभाव्य पक्षबदलामुळे सोलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे दिसत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















