Minister Bharati Pawar : 'शिवसेना गुन्हेगारांचं समर्थन करतेय? फरार नगरसेवक राऊतांसोबत : भारती पवार
नाशिकमध्ये भाजप कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेले शिवसेनेचे नगरसेवक दीपक दातीर आणि नगरसेविकेचे पती बाळा दराडे आज खासदार संजय राऊत यांच्याबरोबर दिसले. या दोघांवर नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत आणि पोलीस त्यांचा गेले दोन दिवस शोध घेत आहेत.
केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ भारती पवार यांनी या नगरसेवकांवरून शिवसेनेवर जोरदार टीका केलेय. शिवसेना आता गुन्हेगारीचं समर्थन करायला लागली का असा प्रश्न त्यांनी विचारलाय.
भाजपनंही आरोपींना अटक करावी या मागणीसाठी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. पोलीस या दोघांच्या मागावर होते. पण हे दोघेजण आज खासदार संजय राऊत यांना मुंबईत भेटले आणि पत्रकारांशी बोलताना ते दोघेही त्यांच्या मागे होते. त्यावर राऊत यांनीही नंतर प्रतिक्रिया दिली.
महत्त्वाच्या बातम्या























