Mhada Exam : राज्यात पेपर फोडणाऱ्यांची टोळी - आव्हाड ABP MAJHA
आरोग्य भरती आणि टीईटी परीक्षेच्या घोळानंतर आता म्हाडाच्या भरती परीक्षेत देखील आता घोळ झालेला पाहायला मिळालाय... म्हाडाची आज आणि पुढील आठवड्यात होणारी परीक्षा रातोरात पुढे ढकलण्यात आली... त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला... तर आरोग्य विभागाच्या पेपरफुटीच्या प्रकरणातील आरोपींकडून म्हाडाच्या परीक्षेतही पेपर फोडला जाणार असल्याची माहिती मिळाली म्हणून परीक्षा अचानक रद्द करावी लागल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.... तर राज्यात पेपरफुटीचं रॅकेट सुरु आहे... आणि ते उद्धवस्त केलं पाहिजे असं देखील जितेंद्र आव्हाड म्हणालेयत... तर विशेष म्हणजे ज्या कंपनीला हे कंत्राट दिलं होतं त्याच कंपनीच्या लोकांनी हा पेपर फोडण्याचं काम केलंय... त्यामुळे एकंदरीतच आता पेपर घेणाऱ्या संस्थेच्या भोवतीचं संशयाचं वर्तुळ निर्माण झालंय...