एक्स्प्लोर
City 60 Superfast News : सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा : 07 September 2025 : ABP Majha
संसद भवन परिसरात भाजपा आणि मित्र पक्षांच्या खासदारांची कार्यशाळा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांसह अनेक मंत्री आणि खासदार उपस्थित आहेत. जीएसटीमधील सुधारणांबाबत मोदींचा गौरव केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी उद्या पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. गणेश विसर्जनानंतर मुंबईतील चौपाट्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जुहू चौपाटीवर अमृता फडणवीस आणि अभिनेता अक्षयकुमार उपस्थित होते. लालबागच्या राजाचं विसर्जन समुद्रात मोठी भरती आल्यामुळे रखडलं. पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सव्वीस तास पूर्ण झाले, तरी काही मिरवणुका रेंगाळलेल्या आहेत. आज यंदाचं दुसरं चंद्रग्रहण रात्री नऊ वाजून सत्तावन्न ते मध्यरात्री एक वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत लागणार आहे. चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी, शिर्डी साई मंदिर आणि कोल्हापूर अंबाबाई मंदिरातील धार्मिक विधी आणि आरतीच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. शनिशिंगणापूर शनिदेवाच्या पुजाऱ्यांना आता दक्षिणा नाही. शंभर रुपये शुल्क भरून भाविकांना अभिषेक करता येईल. मराठा आरक्षणाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. मराठा समन्वयक आणि अभ्यासक डॉक्टर संजय लाखेपाटलांनी काही मागण्या कायदेशीर नसल्याचं म्हटलं आहे. बीडमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे 'देवेंद्र बहुबली आरक्षणाचे जनक' असे बॅनर झळकले. धनंजय मुंडेंनी सामाजिक समतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर, "आम्ही श्रेयवादाच्या लढाईत नाहीत. मराठा समाज आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम महायुती सरकार करतय," अशी शिंदे यांची प्रतिक्रिया आहे. धाराशिवमध्ये विसर्जन मिरवणुकीत खासदार ओम राजे आणि आमदार पुत्र मल्हार पाटील आमनेसामने आले. सोलापुरात एका नेत्याचा नशा करतानाचा व्हिडीओ अंजली दमानियांकडून पोस्ट करण्यात आला. पुणे गँगवर प्रकरणातील मोर्च्यावर गुन्हा दाखल झाला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवांवर परिणाम झाला आहे.
महाराष्ट्र
Bandu Andekar Election Nomination: तोंडावर काळा कपडा,हातात साखळी,जेलमधून बाहेर येत बंडूआंदेकरचा अर्ज
Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...
Khopoli Mangesh Kalokhe यांच्या हत्येचा CCTV, नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखेंचे पती मंगेश काळोखे
Sunil tatkare On mahayuti : आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर होणार
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण






















