Marahtwada Muktisangram: मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाचा समारोप, मुख्यमंत्री ध्वजारोहण करणार
Marahtwada Muktisangram: मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवाचा समारोप, मुख्यमंत्री ध्वजारोहण करणार
आज मराठवाड्यात मुक्ती संग्राम दिन , मराठवाड्यात मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा करण्यात येतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात येणार आहे..
स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर 1948 मध्ये भारत सरकारने निजाम शासनाविरुद्ध पोलिस कारवाई करुन हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात सामावून घेतले. 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद राज्य निजामापासून मुक्त केले गेले. म्हणून आजचा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एका वर्षानंतर मराठवाडा मुक्त झाला. या वेळी थोर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली अनेक स्वातंत्र्यसेनानींनी केलेल्या कामांमुळे आज या दिनाला विशेष महत्त्व आहे